Description
ज्योतिष सूत्रे कोर्स हा ज्यांना मूलभूत ज्योतिष संकल्पना माहिती आहेत पण त्याचा व्यावहारिक उपयोग कसा करायचा हे नीटसे समजले नाही अशा ज्योतिष विषयाचे प्राथमिक ज्ञान असणाऱ्या ज्योतिष अभ्यासकांसाठी आहे. ग्रह जरी आकाशात फिरत असले तरी घटना मात्र पृथ्वीवर घडतात. “ग्र” म्हणजे ग्रहण करणे आणि “ह” म्हणजे हनन करणे. म्हणजे ग्रह ती शुध्द सात्विक चेतना ग्रहन करून केंद्रापासारी गतीने हनन करतात. आपली आजोबाजूच्या चर आणि अचर सृष्टीवर त्या ग्रहांच्या लहरी पडतात आणि त्यातूनच ग्रहांचे प्रतीकात्मक अस्तित्व जाणवत असते. त्यांचा वापर पत्रिका सोडविताना कसा करायचा , ग्रहांच्या मूलभूत धारणा ज्याला बीजगुण म्हणतात ते नेमके दृश्य रूपात कसे समोर येतात आणि प्रत्येक वेळी दृश्य रूप वेगळे असले तरी धारणा तीच असते.
तुम्ही या कोर्स मध्ये काय शिकाल ?
- ज्योतिष सोप्या पद्धतीने कसं शिकावं ?
- संकल्पनाचा व्यवहारात वापर कसा करावा ?
- कोणत्या घटकाचे महत्व किती ?
- भावेश महत्वाचा कि भावस्थ ग्रह ?
- महादशा कशा वापराव्यात ?
- दृष्टी कशी वापरावी ?
- माराकेश बाधकेश अशा संकल्पना खरंच मदत करतात का ?
- आणि इतरही बऱ्याच संकल्पना
व्याख्यान संख्या : ४
१) क्लास १ : प्रास्ताविक
२) क्लास २ : बीजगुण म्हणजे काय
३) क्लास ३ : कारकत्व व्यवहारात कसे वापरावे – भाग १
४ ) क्लास ४ : कारकत्व व्यवहारात कसे वापरावे – भाग २
आधी शिकलेल्या संकल्पना पक्का करण्यासाठी हा एक उत्तम कोर्स आहे.
kiran patil –
*****