Description
पंचमहाभूतानि हे विश्व बनलेलं आहे . त्यांच्या प्रवृती विविध रुपमधून विविध माध्यमातून या चराचर सृष्टीत प्रकट होत असतात. गुणा: गुणेषु वर्तन्ते या उक्तीनुसार त्यांचे गुण चराचर सृष्टीमध्ये प्रत्येक्त गोष्टीमध्ये असतात आणि ते सतत प्रकट होत असतात. त्यांच्या गुणांची कार्यपद्धती , स्वरूप समजून घेणे हे मूलभूत ज्ञान आहे. ज्योतिष शिका अथवा न शिका , तरीही सर्वांनी ऐकावे असे हे डॉ. विद्याधर घैसास यांचे व्याख्यान.
पंच महाभूतांच्या कार्यपद्धतीमधील साधर्म्य आणि वेगळेपण जाणून घेऊन व्यावहारिक पातळीवर आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. अग्नी तत्वाने प्रभावित व्यक्ती प्रसंगाला सामोरे जाताना ज्या प्रकारे व्यक्त होतात त्याच पद्धतीने जल तत्व व्यक्त न होता वेगळ्या प्रकारे होते.
Reviews
There are no reviews yet.