कोणता क्लास करावा ?

मूलभूत ज्योतिष हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी अगदी छान सुरुवात असेल. पत्रिकेचे अंतरंग अगदी पत्रिका म्हणजे काय इथून सुरु करून क्रमाक्रमाने पत्रिकेचे ९ घटक ( ग्रह , राशी , भाव , नक्षत्र , दृष्टी , योग , दशा , गोचर आणि वर्गबळ) उलगडवून तुमचा पाया पक्का करणारा  हा अभ्यासक्रम तुमच्या भविष्यातील  ज्योतिष शास्त्रातील प्रगतीची हमी नक्की देईल. 

प्राथमिक ज्योतिष हा क्लास तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ज्योतिष शास्त्राची शास्त्रशुद्ध ओळख सध्या सोप्या भाषेत , अतिविस्तरीत नाही आणि अतिसंक्षिप्त नाही . हा क्लास केल्यानंतर तुम्हाला ज्योतिष शास्त्राचे प्राथमिक ज्ञान नक्की असेल जेणेकरून तुम्हाला तुमची पुढची वाटचाल कशी असावी याचा निर्णय तुम्हाला घेता येईल. 

प्राथमिक ज्योतिष शास्त्र ही उत्तम सुरुवात असेल. बऱ्याच ज्योतिषांचा अभ्यास हा पुस्तकी असतो. पृथ्वीवरील आपल्या अवती भोवतीच्या घटकांशी ज्योतिष कसे जोडावे हे त्यांना शिकविले जात नाही. प्राथमिक ज्योतिष अभ्यासक्रमात पत्रिकेतील ९ घटक , त्यांचे बीजगुण , त्यांचा व्यावहारिक पातळीवरील अर्थ आणि उपयोग शिकविला आहे पण हे करीत असताना तुम्हाला पारंपारिक ज्योतिष विषयाची माहिती आहे हे गृहीत धरले जाते. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचा ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करू शकता. प्राथमिक ज्योतिष झाल्यावर ज्योतिष तर्क नावाचा क्लास हा उत्तम पद्धतीने तुमचे ज्ञान कायमस्वरूपी घट्ट करतो. त्यामुळे तोही अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे आमच्या अनुभवात आलेले आहे. 

अतिप्रगत आरोग्यजातक आणि रंग सावल्या हे दोन कोर्स तुम्हाला वैद्यकीय विषयाच्या पत्रिका सोडविण्यात पूर्णपणे पारंगत करेल. astrodiagnosis कसे करावे , रोगांची astropathology कशी शोधावी इथून वैद्यकीय शास्त्राला पूरक असे उपाय कसे सुचवावेत इथपर्यंत सर्व ज्ञान या दोन अभ्यासक्रमात तुम्हाला मिळेल. तुमचा ज्योतिष शास्त्राचा मूलभूत अभ्यास झालेला आहे असं हा गृहीत धरून कोर्सची रचना आहे. 

बहुतांश कोर्सेस सोबत परिपूर्ण नोट्स मिळतात. त्या pdf स्वरूपात तुम्हाला दिल्या जातात ज्या ठुम्ही छापून घेऊ शकता. काही क्लास मध्ये विषय नीट कळावा म्हणून powerpoint वापरल्या जातात. त्याही दिल्या जातात.  

प्रत्येक कोर्स साठी शंका निरसन करण्यासाठी ठराविक Frequency ने शंका निरसन चे live session घेतले जाते. उदा. दर महिन्याला एक शंका निरसन क्लास .  त्यात  तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. whatsapp च्या माध्यमातून सुद्धा शंका निरसन केले जाते.   

Head Office
Privacy Policy

Social Media

Copyright © 2022 seruni, All rights reserved. Powered by MoxCreative.