About Course
ज्योतिष सूत्रे कोर्स हा ज्यांना मूलभूत ज्योतिष संकल्पना माहिती आहेत पण त्याच्या व्यावहारिक उपयोग कसा करायचा हे नीटसे समजले नाही अशा ज्योतिष विषयाचे प्राथमिक ज्ञान असणाऱ्या ज्योतिष अभ्यासकांसाठी आहे. ग्रह जरी आकाशात फिरत असले तरी घटना मात्र पृथ्वीवर घडतात. ग्रा म्हणजे ग्रहण करणे आणि ह म्हणजे हनन करणे. म्हणजे ग्रह ती शुध्द सात्विक चेतना ग्रहन करून केंद्रापासारी गतीने हनन करतात. आपली आजोबाजूच्या चर आणि अचर सृष्टीवर त्या ग्रहांच्या लहरी पडतात आणि त्यातूनच ग्रहांचे प्रतीकात्मक अस्तित्व जाणवत असते. त्यांचा वापर पत्रिका सोडविताना कसा करायचा , ग्रहांच्या मूलभूत धारणा ज्याला बीजगुण म्हणतात ते नेमके दृश्य रूपात कसे समोर येतात आणि प्रत्येक वेळी दृश्य रूप वेगळे असले तरी धारणा तीच असते.
बीजगुण समजून सांगणारा हा संक्षिप्त कोर्स आहे. तुमच्या पारंपारिक ज्ञानाला धार देण्यासाठी अतिशय उत्तम .
१) व्याख्यान १ : प्रास्ताविक
२) व्याख्यान २ : बीजगुण म्हणजे काय ? ग्रहांचे बीजगुण , राशींचे बीजगुण ( २ तास )
३) व्याख्यान ३ : नक्षत्रांचे बीजगुण , आजू बाजूंच्या वस्तूंमध्ये , गोष्टींमध्ये बीजगुण कसे ओळखावे ?
४ ) व्याख्यान ४ : कारकत्व व्यवहारात कसे वापरावे – भाग २
Course Content
ज्योतिष सूत्रे
-
प्रास्ताविक
37:40 -
बीजगुण पद्धत ग्रहांचे आणि राशींचे बीजगुण
02:00:00 -
नक्षत्र दृष्टी दशा योग बीजगुण
01:48:00 -
बीजगुण व्यवहारात कसे वापरावे
01:38:00