Description
या अभ्यासक्रमात तुम्ही काय शिकाल ?
अर्थार्जन हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. किंबहुना तो ४ पुरुषार्थांपैकी एक आहे ( धर्म अर्थ काम मोक्ष ). त्यामुळे त्या बाबतील पत्रिकेचे विश्लेषण अतिशय काळजीपूर्व आणि सखोल होणे आवश्यक आहे. कालपरत्वे career या शब्दाच्या व्याख्या बदलतात . नवनवीन क्षेत्रे निर्माण होतात. पत्रिकेतील घटकांचे मूलभूत गुणधर्म समजावून घेऊन त्यांचा आजच्या काळातील करीअर पर्यायांशी सबंध जोडता येण्यासाठी पत्रिकेतील अर्थ त्रिकोण कसा विश्लेषण करावा या संबंधीचे ज्ञान या अभ्यासक्रमात देण्यात आलेले आहे. नोकरी व्यावायात अनेक चढ उतार येतात आणि असे प्रश्न घेय्न जातक ज्योतिषाकडे येतात तेंव्हा ते चढ उतार पत्रिकेत कसे निदर्शित होतात याचेही सखोल विश्लेषण या अभ्यासक्रमात केलेले आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पत्रिकेतील अर्थ त्रिकोण विश्लेषण करण्याची तुमची क्षमता कित्तेक पटीने वाढेल.
सर्वसाधारण पणे खालील विषय या अभ्यासक्रमात आहेत
- करिअर विश्लेषण कसे करावे : एखाद्याने नोकरी करावी का धंदा का व्यवसाय ? कोणता व्यवसाय जास्त लाभेल ? व्यवसाय करीत असतानामिळालेली गुणवत्ता कशी वापरावी ? भागीदारी करावी का ? असे अनेक पैलू
- नोकरीतील बदल : नोकरीतील चढ उतार कसे पहावेत ? नोकरीतील बढतीचे योग ? चांगली नोकरीतील गंडांतर , बदली , परदेशगमनाच्या संधी , व्यवसायाला पोषक ग्रहस्थिती
- प्रत्यक्ष सोडविलेल्या पत्रिका : नोकरी व्यवसाय विश्लेषण केलेल्या प्रत्यक्ष पत्रिका , सुचविलेले उपाय आणि आलेली प्रचीती याचे सखोल मार्गदर्शन
Class 1 – नौकरी, व्यवसाय आणि अर्थप्राप्ती याचा प्रोटोकॉल प्रत्येक्ष पत्रिका सोडवून दाखवणे
Class 2 – पत्रिकेतील धन त्रिकोणाचा गोषवारा आणि पत्रिकेत त्याचा वापर
Class 3 – पत्रिका सोडवण्याचे धागे आणि त्याची सूत्रबद्ध आखणी
Class 4 – अर्थचक्र पत्रिकेचा प्रोटोकॉल आणि प्रत्यक्ष application
Class 5 – पत्रिका सोडवणे, नोकरीचे स्वरूप आणि त्याचा पत्रिकेत संबंध
Class 6 – अर्थचक्र साठी महत्वाचा planet आणि तो पत्रिकेत कसा जोडला जातो यांचे विश्लेषण
Class 7 – व्यवसायाच्या पत्रिका आणि प्रोटोकॉल अभ्यास
Class 8 – ग्रहांचे कारकत्व आणि ते पत्रिकेत कसे वापरायचे यांचा अभ्यास
Class 9 – पत्रिका सोडवून दाखवणे
Class 10 – सोडवलेल्या पत्रिका स्वत: अभ्यासाने
Class 11 – अर्थप्राप्ती चा विचार आणि पत्रिका संबंध
Class 12 – क्लास च्या नोट्स पीडीएफ स्वरूपात
Sachin Pradhan –