Description
पत्रिका म्हणजे काय इथून सुरु करून ज्योतिष शास्त्रातील ९ घटक ज्याने पत्रिका तयार होते त्या सर्व घटकांची सूत्रबद्ध माहिती आणि काही प्रत्यक्ष सोडवून दाखवलेल्या पत्रिका असा परिपूर्ण अभ्यासक्रम .ज्योतिष शिकण्याची सुरुवात इथून करा आणि पाया पक्का करा. पक्या पायावरच तर्काची उंच इमारत उभी राहू शकते.
या क्लास इतके सखोल ज्योतिष कोठेही शिकविले जात नाही हा आमचा दावा आहे आणि तुम्ही असां क्लास दाखवून दिलात तुमचे पैसे आम्ही परत करू असे लिहिण्याची हिंमत आमची आहे.
तुम्ही काय शिकाल ?
- ज्योतिष शास्त्राच्या मूलभूत संकल्पना : अगदी विश्वनिर्मितेचे १२ टप्पे , माती मति आणि गती , सापेक्षता अशा सिद्धांताचा ग्रहांशी असेलला संबंध आणि विश्वात घटना कशा घडतात याचे ज्ञान. ज्योतिष शास्त्रातील ९ घटकांची ( ग्रह राशी भाव नक्षत्र दृष्टी योग दशा गोचर आणि वर्गबळ ) शास्त्रशुद्ध सखोल माहिती अतिशय सोप्या भाषेत
- पत्रिका सोडविण्याचा तर्क : केवळ ग्रह राशींची माहिती म्हणजे ज्योतीष नव्हे . माहितीचे बिंदू जोडण्याची कला म्हणजे ज्योतिष. नेमके हे तुम्ही नक्की शिकाल. आणि हाच या क्लास चा USP आहे.
- सोडविलेल्या पत्रिका : शिकविलेले नियम कोठेही न बदलता पत्रिकांना लावून दाखवलेल्या पत्रिका . विवाह , परदेशगमन ,आरोग्य , शिक्षण , व्यवसाय , नोकरी अशा विविध विषयांवरील पत्रिका
Class 1 – परिचय , ज्योतिष म्हणजे काय?,
Class 2 – शिकवल्या गेलेल्या अभ्यासवर विद्यार्थ्याचे शंका निरसण
Class 3 – कालचक्र सखोल माहिती , पंच महाभूते आणि पंच ज्ञानेंद्रिय
Class 4 – शंका निरसण
Class 5 – पत्रिका कशी तैयार होते , पत्रिका म्हणजे काय , आणि पत्रिकेतील मूलभूत घटक
Class 6 – बारा भाव , बारा राशी, लग्न म्हणजे काय यांचा आढावा, आणि भावांचे बीजगुण म्हणजे काय?
Class 7 – भाव बीजगुण सखोल अभ्यास, भावाचे कार्यकत्व
Class 8 – विद्यार्थाचे प्रश्न आणि शंका निरसण
Class 9 – भाव गुणधर्म, भावांची वेगवेगळी नावे , आणि राशी विचार मेष ते कन्या
Class 10 – राशी विचार तूळ ते मीन , आणि ग्रह विचार
Class 11 – ग्रह ,त्यांचे गुणधर्म आणि बीजगुण
Class 12 – ग्रहांचे उच्च , नीच राशी , ग्रहांची अवस्था आणि नक्षत्र विचार
Class 13 – नक्षत्र तत्व, स्वामी, वृक्ष,
Class 14 – ग्रह योग
Class 15 – महादशा – विचार
Class 16 – ग्रहांचे गोचर भ्रमण विचार , झालेल्या अभ्यासाची उजळणी
Class 17 – पत्रिका काशी सोडवायची ? पत्रिकेतील घटक कसे वापरायचे ?
Class 18 – प्रत्येक्ष पत्रिका सोडवणे
Class 19 – वर्गबळ, षोडषवर्ग कुंडल्या विचार
Class 20 – घटनेचे विश्लेषण कसे करावे आणि त्याचे महत्व
Class 21 – पत्रिका सोडवून दाखवणे
Ruddhi Wadadekar –
मूलभूत ज्योतिष अभ्यास क्रम हा ज्योतिष शास्त्र शिकण्याचा पाया आहे. सगळ्या basic concepts अगदी छान समजावून सांगितल्या आहेत. प्रत्येक विषय अगदी विस्तृत पणे आणि सखोल मांडला आहे. Asynchronous structure of this course makes it easy to access the videos anytime , anywhere. The notes are in detail.
I would highly recommend this course to anyone who wants to start learning about astrology.
Shital Koshti –
मूलभूत ज्योतिष हा घैसास सर आणि मनोज सर यांनी घेतलेला क्लास घरचं खुप अदभुत आहे , त्याची बीज गुण पद्धत नाविन्यपूर्ण आणि नौखी आहे, ज्योतिषशास्त्रात असा विचार आणि अभ्यास आज पर्यंत कोणी केला नाही जो सरांनी सहज सोप्या भाषेत शिकवला आहे . ज्योतिष शास्त्र नव्याने शिकणारे, शिकण्याची इच्छा असलेले आणि जे शिकले आहेत त्यांनी सरांचे e- course नक्की कारा , ज्ञानाचा सागर आहेत असे हे सर्व क्लास आहेत मी स्वतः घेतले आहेत आणि घेत आहे
Dr. Avinash Barhate –
ज्यो. घैसास सरांचे अर्धशतकी संशोधन आणि ज्यो. मनोज सरांची सोपी मांडणी यामुळे हा बीजगुण पद्धतीवर आधारित मूलभूत कोर्स खरेच परिपूर्ण झाला आहे. खूप नव्या संकल्पना आत्मसात करता आल्या. त्या, पत्रिका व ज्योतिषीय प्रश्न सोडविताना, कशा वापरायच्या हे शिकलो. ज्योतिषशास्त्राचा पाया मजबूत करण्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरला.
Sudhir Sane –
Astrology Foundation Course is extremely well designed for those aspiring to understand what exactly Astrology is as a comman man and from further learning point of view as well. Many of the misconcneptions which were either read in books or while attending any other class on the subject, are clear. Simple logic and method of explaining the various concepts is worth appreciating. Thank you so much Shri Ghaisas sir and Shri Manoj sir…
Sulabha Kulkarni –
हे विषय मी सरांकडे शिकले आहे. शिकविण्याची पध्दत खूप छान आहे. विषयाचे सखोल ज्ञान, बीजगुण पध्दतीचा वापर से इतर कुठल्याही वर्गात आढळत नाही. सप्तपदी कोर्स सुध्दा खूप छान. सरांचे ज्ञान म्हणजे अथांग सागर. सगळ्यांनी क्लास केल्यास खूप छान होली. आपलाआत्मविश्वास वाढेल. चला तर मग एक पाऊल पुढे टाकूया आणि जोतिषाच्या अनोख्या विश्वात जाऊं या.
Anuradha Rangnekar –
हा कोर्स म्हणजे 6 महिन्यात तुम्ही फालदेशा पर्यंत कसे पोहचू शकता याचा अत्यंत स्टेप बाय स्टेप, शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास, आदरणीय घैसास सर आणि मनोज सर यांनी आम्हाला 6 महिन्यात इतके तयार केले आहे पत्रिका पाहून अचूक फलादेश कसा द्यावा हया तंत्रामध्ये, जे कित्येक वर्ष आम्ही चाचपडत होतो. मी हा कोर्स करायला मिळाल्याने स्वतःला भाग्यवान समजते. आपणा सर्व ज्योतिष अभ्यासकांनी जरूर हा कोर्स करावा
Varsha Sahatrabuddhe –
मी काही वर्षांपासून ज्योतिष्या वरची पुस्तके वाचत होते पण त्यातून एक दिशा मिळत नव्हती.
सुरवात कुठे करायची कळत नव्हते. मूलभूत ज्योतिष हा क्लास केल्यावर आता पत्रिका बघितल्यावर मनात काहीतरी विचार तरी सुरु होतो. तर्काला धरून आणि कुठेही भरकटत न जाता विचार कसा करावा हे शिकायला मिळाले.
तुम्हा दोघांचेही मार्गदर्शन असेच मिळत राहो
Shubhangini Pangarkar –
हा course म्हणजे प्रचंड ज्ञान. इतरत्र कुठेही मिळणार नाही असे ज्ञान ह्या course मध्ये आहे. ज्योतिष शिकल्याचा आनंद मिळाला, साधे – सोपे उपाय सुद्धा विलक्षण काम करतात याची प्रचिती आली.
धन्यवाद
Dr. Chetan Modgi –
नमस्कार ज्योतिष हे अध्यात्माचे चक्षु आहेत आणि त्याला त्याच तन्मयतेने शिकवून सर्वांना एक दृष्टिकोन देणे हे अत्यंत पवित्र कार्य आदरणीय घैसास सर आणि आदरणीय मनोज सर यांच्या माध्यमातून गेले 6 महिने आम्ही डोळ्याने पाहिले आणि अनुभवले आहे.शास्त्रीय अभ्यास आणि संशोधनात्मक वृत्ती हा या फाउंडेशन कोर्सचा गाभा आहे. अत्यंत जुजबी ज्ञान मिळण्याचे हे एकमेव ठिकाण आहे.मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की या उत्कृष्ट कोर्सचा मला भाग होता आले.आपल्या सर्व ज्योतिष प्रेमी अभ्यासकांनी देखील आजच्या Digital युगात सरांच्या Online Course ची पर्वणी नक्की घेऊ शकतात हे हमिपूर्वक आणि अनुभवसिद्ध पद्धतीने सांगू शकतो.पुन्हा एकदा आदरणीय ज्योतिषाचार्य वेदमूर्ती घैसास सर आणि ज्योतिषाचार्य मनोज सर यांना मनपूर्वक धन्यवाद 🙏हरी ओम 🙏डॉ चेतन मोदगी, MDS,PhD,सहयोगी प्राध्यपक,शासकीय दंत महाविद्यालय, सिलचर, आसाम,भारत
Shivendra Shete –
पुस्तक वाचून ज्योतिष शिकण्यास सुरुवात केली पण सरांचे बीजगून ही नव्याने कळलेली पद्धत खूप वेगळी वाटली आणि मी क्लास ला admission घेतली घरच अद्भुत असे ज्ञान आणि कुठेही शिकण्यास मिळणार नाही अशी ही बीज गुण मी इथे शिकलो धन्यवाद सर तुमच्यामुळे विचार करण्यास नवीन दिशा मिळाली